Vaibhav Suryavanshi scores 190 off 90 balls in NCA practice match : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ गाजवणाऱ्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने पुन्हा एकदा आक्रमक खेळीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी वैभवने आणखी एक तुफानी खेळी केली. त्याने बंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात ९० चेंडूंत १९० धावा चोपल्या. १४ वर्षीय खेळाडूने आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना ३५ चेंडूत ऐतिहासिक शतक झळकावले होते. त्यानंतर त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या १९ वर्षांखालील संघात निवडले गेले.