Litton Das creates history in Test cricket's 149-year journey! Bangladesh wicketkeeper scores a century and contributes to eight dismissals
esakal
Litton Das Achieves Never-Seen-Before Feat In Test Cricket: बांगलादेश-दक्षिण आफ्रिका यांच्यातला पहिला कसोटी सामना वेगळ्याच विक्रमामुळे चर्चेत आला आहे. बांगलादेशच्या पहिल्या डावातील ४०० धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेने ५५७ धावा उभ्या केल्या. हे वृत्त लिहित असताना बांगलादेशने ११३ धावांवर ५ विकेट्स गमावल्या आहेत आणि अजूनही ते ४४ धावांनी पिछाडीवर होते. पण, हा सामना लिटन दासमुळे चर्चेत आला... कसोटी क्रिकेटच्या १४९ वर्षांच्या इतिहासात कोणालाच न जमलेला पराक्रम बांगलादेशच्या यष्टिरक्षक-फलंदाजाने करून दाखवला.