17-Year-Old Vikalp Tiwari Slams 119 Off 56 Balls in SMAT, Becomes Second Youngest T20 Centurion After Vaibhav Sooryavanshi
esakal
Chhattisgarh captain Vikalp Tiwari smashes 119 off 56 balls: भारतीय क्रिकेटमध्ये सध्या वैभव सूर्यवंशीचे नाव जोरदार चर्चेत आहे.. १५ वर्षाच्या या पोरानं जगातील क्रिकेट चाहत्यांना त्याच्या आक्रमक खेळीच्या प्रेमात पाडले आहे. इंडियन प्रीमिअर लीगमधून आलेला हा बिहारचा पोरगा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही छाप पाडून गेलाय... आता आणखी एक डावखुरा फलंदाज ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये नाव कमावू इच्छित आहे आणि त्याने त्याच्या फलंदाजीचा जलवा बुधवारी दाखवला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत छत्तीसगड संघाचे नेतृत्व करणाऱ्या १७ वर्षीय विकल्प तिवारीने ओदिशाच्या गोलंदाजांची धुलाई केली आणि शतक ठोकले.