

Sarfaraz Ahmed Retirement
Sakal
पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार सर्फराज अहमद याने रविवारी (१५ मार्च) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. साधारण दोन दशके आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय राहिल्यानंतर त्याने निवृत्तीची (Sarfaraz Ahmed Retirement) घोषणा केली आहे.
तो पाकिस्तानचा इम्रान खान आणि युनूस खान यांच्यानंतर आयसीसी स्पर्धा जिंकणारा तिसरा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात पाकिस्तानने २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाला पराभूत करत विजेतेपद जिंकले होते.