२७ चौकार, १० षटकार! बांगलादेशच्या Towhid Hridoy ची ३५० धावांची नाबाद खेळी; घडवला इतिहास, दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांची धुलाई

Towhid Hridoy breaks Bangladesh first-class cricket record: बांगलादेशचा युवा फलंदाज तौहिद हृदोयने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत विक्रमांच्या यादीत आपले नाव कोरले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई करताना त्याने अक्षरशः धावांचा पाऊस पाडला.
Towhid Hridoy smashed an unbeaten 350 off 481 balls

Towhid Hridoy smashed an unbeaten 350 off 481 balls

esakal

Updated on

Bangladesh batter Towhid Hridoy creates history with 350: बांगलादेशचा २५ वर्षीय फलंदाज तौहिद हृदोय याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक खेळी केली. सहा वर्षांपूर्वी ज्या मैदानावर त्याने बांगलादेशला १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता, त्या Potchefstroom मैदानावर बांगलादेश अ संघाचे नेतृत्व करताना त्याने इतिहास घडवला. दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने ३५० धावांची खेळी केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३०० + धावांची खेळी करणारा तो तिसरा बांगलादेशी फलंदाज ठरला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com