Who is Virandeep Singh Malaysia cricketer
esakal
Mumbai Indians interest in Virandeep Singh IPL 2026 Auction : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ साठी होणाऱ्या मिनी लिलावाची तारीख जवळ आली आहे. १६ डिसेंबरला अबु धाबी येथे भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजल्यापासून लिलावाला सुरुवात होणार आहे. ३५९ खेळाडूंची अंतिम यादी BCCI ने काल जाहीर केली आणि यापैकी फक्त ७७ खेळाडूंना आयपीएल २०२६ मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. यात ३१ जागा या परदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत. कोलकाता नाइट रायडर्स सर्वाधिक ६४.३ कोटी अन् सर्वाधिक १३ खेळाडूंची रिक्त जागा भरण्यासाठी लिलावात दाखल होतील. त्याचवेळी मुंबई इंडियन्स सर्वात कमी म्हणजेच २.७५ कोटीसह लिलावात ५ खेळाडूंना खरेदी करण्यासाठी येतील.