IPL Teams Dominate India’s 2026 T20 World Cup Squad
esakal
4 Mumbai Indians players in T20 World Cup 2026 squad: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची नुकतीच घोषणा झाली. १५ सदस्यीय या संघात इंडियन प्रीमिअर लीगच्या फ्रँचायझीचे वर्चस्व पाहायला मिळतेय. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील या संघात मुंबई इंडियन्सच्या सर्वाधिक ४ खेळाडूंचा समावेश आहे. सूर्यासह हार्दिक पांड्या, तिलक वर्मा व जसप्रीत बुमराह हे MI चे खेळाडू भारताच्या वर्ल्ड कप संघात आहेत. २०१८ मध्ये सूर्याने पुन्हा ही फ्रँचायझी जॉइन केली, तर २०२४ च्या लिलावापूर्वी हार्दिक पांड्यासाठी मुंबईने गुजरात टायटन्ससोबत यशस्वी ट्रेड केला.