दक्षिण आफ्रिकेच्या मॅथ्यू ब्रित्झकेने सलग चौथ्या वन डे सामन्यात अर्धशतक ठोकले.
१९८७ नंतर असा पराक्रम करणारा तो जगातील फक्त दुसरा फलंदाज ठरला.
ब्रित्झकेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ८८ धावांची खेळी साकारली.
South Africa vs Australia 2nd ODI highlights 2025 : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा वन डे सामना खेळवला जातोय आणि आफ्रिकेच्या मॅथ्यू ब्रित्झके ( MATTHEW BREETZKE ) याने सातत्यपूर्ण कामगिरी करताना अर्धशतक झळकावले. त्याचे कारकीर्दितील दुसरे शतक १२ धावांनी हुकले असले तरी त्याने वन डे क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकाच फलंदाजाला जमलेला पराक्रम केला आहे. १९८७ मध्ये असा पराक्रम भारतीयाने केला होता आणि २०२५ मध्ये ब्रित्झकेकडून त्याची पुनरावृत्ती झाली.