संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्सला पत्र लिहून फ्रँचायझीतून रिलीज करण्याची विनंती केली आहे.
त्याच्या या निर्णयामागे युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीचे आगमन हे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे.
आकाश चोप्राने दावा केला की सूर्यवंशीमुळे संघात ओपनिंगसाठी तणाव निर्माण झाला आहे.
Vaibhav Suryavanshi impact on Sanju Samson IPL future : राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीच्या ताफ्यात सध्या बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी ही फ्रँचायझी ट्रेडिंग विंडोमध्ये संजू सॅमसन किंवा अन्य कोणत्याही खेळाडूला ट्रेड करणार नसल्याचे सांगत होती, परंतु काल संजू सॅमसनने या फ्रँचायझीला पत्र लिहून मला रिलिज करा अशी विनंती केली. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. त्यात आता संजूच्या फ्रँचायझीसोडण्यामागे वैभव सूर्यवंशी कारण असल्याचे समोर आले आहे.