
दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्सला त्याच्या चौफेर फटकेबाजीसाठी ओळखले जाते. त्यामुळे त्याला मिस्टर ३६० असंही म्हटलं जातं. त्याची ही फटकेबाजी इंडियन प्रीमियर लीगमध्येही (IPL) पाहायला मिळाली आहे.
डिव्हिलियर्स २००८ ते २०२१ दरम्यान आयपीएलमध्ये खेळला असून त्याने दिल्ली कॅपिटल्स (पूर्वीचे दिल्ली डेअरडेविल्स) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघांचे आयपीएलमध्ये प्रतिनितित्व केले आहे. दरम्यान, डिव्हिलियर्सप्रमाणे भारताचा टी२० कर्णधार सूर्यकुमार यादव देखील चौफेर फटकेबाजी करतो. त्यामुळे त्यालाही भारताचा मिस्टर ३६० असं म्हटलं जातं.