
Ruturaj Gaikwad Catch Taken by Jitesh Sharma : विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या सेमीफायनलच्या सामन्यात विदर्भ संघाकडून खेळणाऱ्या जितेश शर्माने अप्रतिम झेल पकडला. महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने खेळलेला चेंडू उंच हवेत उडाला, पण स्टंपमागे उभ्या असलेल्या जितेश शर्माने धावत जावून डाईव्ह केला आणि सुंदर झेल करत महाराष्ट्राच्या कर्णधाराला माघारी पाठवले. महाराष्ट्रासमोर मोठे लक्ष्य असताना कर्णधार स्वस्तात परतने हा महाराष्ट्रासाठी मोठा झटका मानला जात आहे.