AB de Villiers: "सचिन तेंडुलकरपेक्षा विराटच कसोटीत भारी..." डिव्हिलियर्सच्या सनसनाटी दाव्याने खळबळ

AB de Villiers Claims Virat Kohli Better Than Sachin Tendulkar in Overseas Tests: भारताच्या दिग्गज फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या दोघांचेही नाव घेतले जाते. पण विराट कसोटीत सचिनपेक्षा सरस असल्याचा दावा एबी डिव्हिलियर्सने केला आहे.
AB de Villiers Claims Virat Kohli Better Than Sachin Tendulkar in Overseas Tests

AB de Villiers Claims Virat Kohli Better Than Sachin Tendulkar in Overseas Tests

Sakal

Updated on

भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांची नावं हमखास घेतली जातात. दोन वेगवेगळ्या पिढीतील या फलंदाजांनी भारतीय क्रिकेट गाजवलं.

सचिन (Sachin Tendulkar) कारकिर्दिच्या अखेरच्या टप्प्यात असताना विराट (Virat Kohli) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील उदयोन्मुख खेळाडू होता. त्यामुळे त्याला भारतीय क्रिकेटमधील सचिनचा वारसदार असंही म्हटलं गेलं.

आज सचिनपाठोपाठ भारतासाठी सर्वाधिक धावा आणि शतके विराटच्या नावावर आहेत. पण असतानाच आता दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने (AB de Villiers) मोठे भाष्य केले आहे. त्याने म्हटले आहे की सचिनपेक्षा विराट कसोटीत (Test Cricket) सर्वोत्तम आहे.

AB de Villiers Claims Virat Kohli Better Than Sachin Tendulkar in Overseas Tests
Joe Root On Sachin Tendulkar Record:'... आता दुर्लक्ष करू शकत नाही', सचिनचा कसोटीतील विक्रम मोडण्याबाबत रुट नेमकं काय म्हणाला?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com