

Abhishek Porel Delhi Capitals cricketer arrested following sexual assault and threat allegations
esakal
ABHISHEK POREL ARRESTED: क्रिकेटविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. इंडियन प्रीमियर लीग २०२६(IPL) मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल सध्या गंभीर प्रकरणामुळे चर्चेत आला आहे.
बलात्कार, धमकी आणि इतर गंभीर आरोपांप्रकरणी अभिषेक पोरेलला पोलिसांनी अटक केली आहे. हुगळी ग्रामीण पोलिसांचे एसपी कुँवर भूषण सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे. पोलिसांनी दमदम पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या इमामी सिटी परिसरातून अभिषेकला ताब्यात घेतलं.