

Abhishek Sharma | India vs West Indies 3rd T20I
Sakal
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात टी२० मालिकातील तिसरा सामना रविवारी (११ ऑक्टोबर) खेळला जात आहे. या सामन्यात अभिषेक शर्माने वादळी अर्धशतक ठोकत अनेक विक्रम केले आहेत. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण अभिषेकने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला.
भारताकडून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा सलामीला फलंदाजीला उतरले. पण संजू सॅमसन दुसऱ्याच षटकात ३ धावांवर बाद झाला. शामर जोसेफने त्याला बाद केले. पण नंतर अभिषेक शर्माने अत्यंत आक्रमक फलंदाजी करताना चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. त्याने अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक केले. त्याला ईशान किशन चांगली साथ देत होता. त्यांच्यात शतकी भागीदारीही केली.