

Abhishek Sharma Scores 68 Off 20 Balls Creates History
Esakal
भारताचा क्रिकेटपटू अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात तुफान फटकेबाजी केली. १५४ धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्माच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने १० षटकातच सामना जिंकला. त्यानं फक्त १४ चेंडूत अर्धशतक झळकावलं तर २० चेंडूत ६८ धावांची खेळी केली. या खेळीत अभिषेक शर्माने अनेक विक्रम केले. यात त्यानं एक असा विश्वविक्रम केला जो याआधी कॅनडाच्या क्रिकेटपटूच्या नावे होता.