

Abhishek Sharma - Ishan Kishan | India vs England T20I
Sakal
India vs England 1st T20I: इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील टी२० मालिकेचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, पण असे असले तरी या सामन्यात भारताची फलंदाजी पूर्ण २० षटके चाहत्यांना पाहाता आली. या सामन्यात अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी अफलातून फटकेबाजी करताना अर्धशतके ठोकली. त्यामुळे भारताने इंग्लंडसमोर १९० धावांचे लक्ष्य ठेवले होते.
या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंड उतरण्यापूर्वीच पावसाला जोरदार सुरुवात झाली. त्यामुळे काही काळ प्रतिक्षा केल्यानंतरही पाऊस न थांबल्याने अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या सामन्यात ईशान किशनच्या रनआऊटची (Ishan Kishan's Run-Out) जोरदार चर्चा झाली.