IND vs AFG: ३२ चेंडूत ८२ धावांच्या खेळीनंतर काय म्हणाला अभिषेक शर्मा? दुबेला २०वी ओव्हर देण्यावर श्रेयस अय्यरचेही स्पष्टीकरण

Abhishek Sharma Reacts 82 Runs Innings: अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात अभिषेक शर्माने ३२ चेंडूत ८२ धावांची वादळी खेळी केली. या खेळीनंतर तो काय म्हणाला जाणून घ्या. तसेच सामन्यातील २० वे षटक शिवम दुबेला गोलंदाजीसाठी का दिले, याबाबतही श्रेयस अय्यरने स्पष्टीकरण दिले आहे.
Afghanistan vs India 1st T20I

Shreyas Iyer & Abhishek Sharma on India vs Afghanistan 1st T20I

Sakal

Updated on

Afghanistan vs India 1st T20I: भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (१३ सप्टेंबर) अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात ७ विकेट्स आणि ३८ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. अफगाणिस्तान-भारत यांच्यामध्ये फ्रेंडशिप कप अंतर्गत ही मालिका खेळवण्यात येत आहे. या विजयात अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) मोलाचा वाटा उचलला.

डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (३/१९) याची प्रभावी गोलंदाजी आणि अभिषेक शर्मा (३२ चेंडूंमध्ये ८२ धावा) व ईशान किशन (३३ चेंडूंमध्ये ४२ धावा) यांची धडाकेबाज फलंदाजी भारताच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. अभिषेक शर्माला याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

Afghanistan vs India 1st T20I
IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com