Abhishek Sharma: २५ षटकार, १५ चौकार अन् २३३ धावा... अभिषेक शर्माचं वादळी द्विशतक; पाहा Video

Abhishek Sharma Hits Double Century: अभिषेक शर्मासाठी झिम्बाब्वेचा दौरा अत्यंत खराब राहिला होता. पण या दौऱ्यावरून परतल्यानंतर त्याने आका एका एकदिवसीय सामन्यात अफलातून फटकेबाजी करत द्विशतक केले आहे.
Abhishek Sharma Hits Double Century

Abhishek Sharma Hits Double Century

Sakal

Updated on

Abhishek Sharma Hits Double Century Video: भारतीय टी२० संघासाठी गेला एक महिना बराच चढ-उताराचा राहिला. आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यातील व्हाईटवॉशनंतर भारतीय संघाने झिम्बाब्वे दौऱ्यात चांगले पुनरागमन करत निर्विवाद वर्चस्व राखले. मात्र हे तिन्ही दौरे भारताला सलामीवीर अभिषेक शर्मासाठी मात्र फारसे खास राहिले नाहीत. तो फार मोठ्या धावा करू शकला नाही.

झिम्बाब्वे दौऱ्यात तर तिन्ही सामन्यात तो १० धावांच्या आतच बाद झाला. त्यामुळे गेल्या काही काळापासून त्याच्यावर टीकाही झाली. असे असतानाच आता तो पुन्हा स्थानिक क्रिकेटकडे वळला आहे. त्याने नुकतेच एका स्थानिक वनडे सामन्यात द्विशतक करत त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

Abhishek Sharma Hits Double Century
IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामना FREE मध्ये कुठे पाहता येणार? जाणून घ्या LIVE ब्रॉडकास्टिंग आणि स्ट्रीमिंगची संपूर्ण माहिती
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com