ABHISHEK SHARMA 0-0-0 IN T20 WORLD CUP, SUNIL GAVASKAR ADVISES PATIENCE BEFORE SUPER 8
esakal
India Super 8 match vs South Africa preview: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी अभिषेक शर्माच्या ( Abhishek Sharma) नावाची जोरदार चर्चा रंगली. अभिषेकच्या वादळी तडाख्यासमोर प्रतिस्पर्ध्यांचा कोणताच गोलंदाज टीकू शकत नाही, असा दावा केला जात होता. आयसीसी ट्वेंटी-२० मधील नंबर वन फलंदाज अभिषेक मात्र वर्ल्ड कपमध्ये अपयशी ठरला. तीन सामन्यांत, तीन भोपळे... त्याच्या नावावर जमा झाले आहेत. सुपर ८ च्या लढतींना सामोरे जाण्यापूर्वी टीम इंडियासाठी अभिषेकचा फॉर्म ही चिंता व्यक्त करणारी गोष्ट बनली आहे. पण, माजी महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी अभिषेकला सल्ला दिला आहे.