AFG vs SL Live : 6,6,6,NB,6,6,1w! ४० वर्षीय मोहम्मद नबीची वादळ खेळी; ६ चेंडूंत केलेल्या ५ धावा, नंतर १६ चेंडूंत ५५ धावांचा पाऊस Video

Mohammed Nabi final over 5 sixes video viral : आशिया चषक २०२५ मधील अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका या सामन्यात ४० वर्षीय मोहम्मद नबीने सर्वांना थक्क करून सोडलं. नबीने सुरुवातीला फक्त ६ चेंडूंत ५ धावा केल्या होत्या. पण नंतर ...
Afghanistan’s 40-year-old Mohammed Nabi smashed 5 sixes in the final over against Sri Lanka

Afghanistan’s 40-year-old Mohammed Nabi smashed 5 sixes in the final over against Sri Lanka

esakal

Updated on

40-YEAR-OLD MOHAMMED NABI SMASHED 6,6,6,6,6 IN THE FINAL OVER : अफगाणिस्तानसाठी करो वा मरो अशा लढतीत ४० वर्षीय मोहम्मद नबीने छाप पाडली. संघाला गरज असताना तो मैदानावर उभा राहिला आणि शेवटच्या २ षटकांत ४९ धावा चोपून श्रीलंकेसमोर १७० धावांचे लक्ष्य उभे केले. अफगाणिस्तानने ७९ धावांवर ६ विकेट्स गमावल्या होत्या. तेव्हा नबी व राशीद खान ही जोडी उभी राहिली. राशीद बाद झाल्यानंतर नबीने मोर्चा सांभाळला आणि २२ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकार खेचून ६० धावा चोपल्या. त्याने २०व्या षटकात पाच षटकार खेचून वादळ आणले..

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com