Afghanistan cricket team celebrates their world-record 200+ run victory over Bangladesh in Abu Dhabi ODI
esakal
AFG vs BAN 3rd ODI record-breaking result : अफगाणिस्तान क्रिकेट संघाने मंगळवारी बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातही विजय मिळवून मालिका ३-० अशी खिशात घातली. अबुधाबीच्या शेख जायेद स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने ९ बाद २९३ धावा उभ्या केल्या आणि बांगलादेशचा संपूर्ण संघ २७.१ षटकांत ९३ धावांवर गुंडालला. अफगाणिस्तानकडून दुसराच वन डे सामना खेळणाऱ्या बिलाल सामीने ७.१ षटकांत ३३ धावा देताना ५ विकेट्स घेतल्या आणि स्टार फिरकीपटू राशीद खानने १२ धावांत ३ बळी टिपले.