chief selector Ajit Agarkar has requested BCCI to extend his contract till the 2027 World Cup
esakal
BCCI chief selector latest news Ajit Agarkar: निवड समिती प्रमुख अजित आगरकर याने त्याचा करार २०२७ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत वाढवण्याची मागणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे केली आहे. भारताचा माजी जलदगती गोलंदाज २०२३ पासून निवड समिती प्रमुख आहे आणि मागील वर्षी आयपीएल २०२५ नंतर त्याचा कार्यकाळ एका वर्षांनी वाढवला होता. पण, आता आगरकरला आणखी एक वर्षांची मुदतवाढ हवी आहे. बीसीसीआयने त्याच्या या मागणीची चर्चा सुरू केली असून अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही.