
Champions Trophy 2025 in Jeopardy as Boycott Calls Grow Against Afghanistan
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) त्यासाठीचं वेळापत्रकही जाहीर केलं आहे, परंतु ज्या लाहोर, रावळपिंडी आणि कराची येथील स्टेडियमवर हे सामने होणार आहेत, तेथील काम अजून अपूर्ण असल्याचे दिसतेय. त्यामुळे ही स्पर्धा पाकिस्तानातून दुबईत खेळवली जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी वेळेत काम पूर्ण होईल, असे आश्वासन दिले आहे. हे एक संकट असता इंग्लंडच्या १६० हून अधिक राजकिय नेत्यांनी इंग्लंड संघाला चॅम्पियन्स ट्रॉफीत अफगाणिस्तानविरुद्ध खेळू नका, असे आवाहन केलं आहे. त्यातच आता दक्षिण आफ्रिकेच्या क्रीडा मंत्र्यानेही विरोधाची तलवार उपसली आहे.