

Why Bangladesh banned IPL telecast and streaming? बांगलादेशात हिंदूवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमिवर BCCI इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधून बांगलादेशचा गोलंदाज मुस्ताफिजूर रहमान याच्या हकालपट्टीचा निर्णय घेतला. कोलकाता नाइट रायडर्सने ( KKR) बीसीसीआयचे म्हणणे ऐकले. पण, यानंतर दोन्ही देशांमधील क्रिकेटचे तणाव आणखी वाढले आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतात होणाऱ्या सामन्यात खेळण्यास बांगलादेशने नकार दिला. त्यांनी थेट आयसीसीकडे तशी मागणी केली आणि आता तर ते पाकिस्तानच्या पावलावर पाऊल टाकताना दिसत आहेत.