T20I World Cup 2026: नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आणखी एक वर्ल्ड कप फायनल; पाच शहरांमध्ये होणार सामने...

ICC T20 World Cup 2026 Venues: पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. बीसीसीआय आणि आयसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे.
T20I World Cup 2026: नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आणखी एक वर्ल्ड कप फायनल; पाच शहरांमध्ये होणार सामने...
Updated on

T20 World Cup 2026 final at Narendra Modi Stadium Ahmedabad: भारतीय महिला संघाने नुकताच नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर वन डे वर्ल्ड कप उंचावला. आता भारतीय चाहत्यांना पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची प्रतीक्षा आहे. भारत या स्पर्धेचा यजमान आहे आणि या स्पर्धेला १०० दिवसांहून अधिक दिवस शिल्लक असताना महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम पुन्हा एकदा फायनल सामन्याच्या आयोजनसाठी सज्ज होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( ICC) लवकरच स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com