'Yashasvi Jaiswal वर ४ सामन्यांच्या बंदीचे पत्र मॅच रेफरीने लिहून ठेवलं होतं...', अजिंक्य रहाणेचा 'त्या' वादाबद्दल खळबळजनक खुलासा

Ajinkya Rahane Breaks Silence on Jaiswal Controversy: दुलीप ट्रॉफी २०२२ फायनलमध्ये अजिंक्य रहाणेने यशस्वी जैस्वालला ड्रेसिंगरूममध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी जैस्वालवर ४ सामन्यांची बंदी लागली असती, याबाबत रहाणेने खुलासा केला आहे.
Ajinkya Rahane Reveals Saving Yashasvi Jaiswal From 4-Match Ban

Ajinkya Rahane Reveals Saving Yashasvi Jaiswal From 4-Match Ban

Sakal

Updated on

Ajinkya Rahane Reveals Saving Yashasvi Jaiswal from Ban: भारत आणि मुंबईचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आणि यशस्वी जैस्वाल यांच्या नात्याबद्दल बऱ्याचदा चर्चा होते. यामागं कारण आहे ते २०२२ दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात झालेल्या घटनेचं. आता याबाबत रहाणेने भाष्य केले असून त्याने म्हटले आहे की त्याच्या हस्तक्षेपामुळे कदाचित जैस्वालवरील ४ सामन्यांची बंदी टळली.

रहाणेने भारताकडून कसोटीत अफलातून कामगिरी केली आहे, याशिवाय त्याने मुंबई संघासाठीही चांगले योगदान दिले. अनेकवर्षे मुंबईचे नेतृत्व करताना त्याने मोठी विजेतीपदंही जिंकून दिली. त्यामुळे तो भारतीय क्रिकेटमधील एक आदरणीय खेळाडू म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे २०२२ मध्ये त्याने जैस्वालबाबत केलेल्या कृतीचेही अनेकांकडून कौतुक होते.

Ajinkya Rahane Reveals Saving Yashasvi Jaiswal From 4-Match Ban
Ajinkya Rahane: 'धोनीच्या निवृत्तीनंतर विराट-शास्त्रींनी टीम इंडियाची मानसिकता बदलली...' रहाणे स्पष्टच बोलला
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com