

Ajinkya Rahane Praises Kohli-Shastri Impact On Test Cricket
Sakal
AJINKYA RAHANE ON VIRAT KOHLI - RAVI SHASTRI ERA: भारतीय संघाला काही अफलातून कसोटी कर्णधार मिळाले, ज्यात विराट कोहलीचेही नाव घेतले जाते. तो भारताचा कसोटीतील सर्वात यशस्वी कर्णधारही राहिला.
एमएस धोनीच्या निवृत्तीनंतर त्याला कर्णधार करणे, हे भारतीय क्रिकेटमधील उल्लेखनीय घटना होती, असं भारताचा माजी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने म्हटले आहे. त्याने म्हटले की विराट आणि रवी शास्त्री यांनी मिळून भारतीय संघाची मानसिकता बदलली.
नुकताच क्रिकेटमधून निवृत्त झालेला रहाणे स्टिक टू क्रिकेट या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता. त्याच्यासह या पॉडकास्टमध्ये इंग्लंडचे मायकल वॉन, सर ऍलिस्टर कूक, फिल टफनेल आणि डेव्हिड बम्बल लॉईड होते. या पॉडकास्टमध्ये रहाणेने विराट आणि शास्त्री यांच्या प्रभावाबाबत भाष्य केले.