Shreyas Iyer अडीच वर्षे T20I संघातून बाहेर असूनही का झाला थेट टीम इंडियाचा कॅप्टन? अजित आगरकरांनी सांगितलं खरं कारण

Why Shreyas Iyer became India T20I Captain: श्रेयस अय्यरला भारताचा नवा टी२० कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे तो भारताच्या टी२० संघात अडीच वर्षांनंतर थेट कर्णधार म्हणून पुनरागमन करेल. त्याबाबत निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर काय म्हणाले जाणून घ्या.
Ajit Agarkar on Shreyas Iyer

Ajit Agarkar on Shreyas Iyer as T20I Captain

Sakal

Updated on

India's New T20I Captain: शनिवारी (६ जून) बीसीसीआयच्या निवड समितीने आगामी इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यांसाठी, तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय टी२० संघांची घोषणा केली आहे.

जूनच्या अखेरीस भारतीय संघ आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाईल. तसेच सप्टेंबरमध्ये जपानला होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघ खेळेल. या सामन्यांसाठी संघाची घोषणा करताना नेतृत्व बदलाचीही घोषणा केली.

बीसीसीआयने (BCCI) आता नवा टी२० कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) आणि उपकर्णधार म्हणून तिलक वर्माची (Tilak Varma) नियुक्ती केली आहे. श्रेयस सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) जागा घेईल. तीन महिन्यांपूर्वी टी२० वर्ल्ड कप जिंकून देणारा कर्णधार सूर्यकुमारला त्याच्या खराब फॉर्ममध्ये कर्णधारपद आणि टी२० संघातील जागाही गमवावी लागली आहे.

Ajit Agarkar on Shreyas Iyer
India T20I Squad: सूर्या ते हार्दिक... T20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघातील ४ मॅच विनर्सलाच मिळाला डच्चू! एका फिनिशरचाही समावेश
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com