

Ajit Agarkar
Sakal
Ajit Agarkar Future Upadate: भारताचे निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या भवितव्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारताला पुढच्या वर्षी वनडे वर्ल्ड कप २०२७ स्पर्धा (World Cup 2027) खेळयची आहे. त्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजत आहे.
आगरकर (Ajit Agarkar) यांचा निवड समिती अध्यक्ष (Selection Committee Chief) म्हणून जून २०२६ पर्यंत कार्यकाळ होता. मात्र आता तो कार्यकाळ वाढवण्यात आला असल्याचे समोर आले आहे.