

Arjun Tendulkar's All-Round Show
Sakal
ARCS Andheri vs Bandra Blasters : आयपीएल २०२६ स्पर्धेत २६ वर्षीय अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) फारशी संधी मिळाली नव्हती. केवळ एक सामना लखनौ सुपर जायंट्ससाठी तो खेळला. मात्र असे असले तरी सध्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या टी२० मुंबई लीगमध्ये (T20 Mumbai League) मात्र तो चमकदार कामगिरी करत आहे.
अर्जुन या स्पर्धेत शिवम दुबे (Shivam Dube)कर्णधार असलेल्या ARCS अंधेरी संघाचा भाग आहे. नुकतेच त्याने या संघासाठी खेळताना सोमवारी ब्रँड्रा ब्लास्टर्सविरुद्ध अफलातून कामगिरी केली. त्याने गोलंदाजीतच नाही, तर फलंदाजीतही नाबाद अर्धशतक केले. त्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कारही मिळाला.