

Arshdeep Singh Engagement
Sakal
Arshdeep Singh and Samreen Kaur Announce Engagement: भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्याने नुकताच साखरपुडा केला असून त्याचे फोटोही शेअर केले आहेत.
खरंतर अर्शदीपसाठी बुधवारचा दिवस अत्यंत खास ठरला आहे. बुधवारी सकाळीच त्याच्या आयपीएल ट्रेडबाबत मोठी घोषणा झाली. अर्शदीप सिंगला पंजाब किंग्सने हार्दिक पांड्याच्या बदल्यात मुंबई इंडियन्सला ट्रेड केले आहे. या ट्रेडची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होतीच, पण त्यावर बुधवारी शिक्कामोर्तब झाले आहे.