IND vs NZ 4th T20I: ग्लेन फिलिप्सचं वादळ पुन्हा घोंगावलं, भारताविरुद्ध शतकासह न्यूझीलंडला पार करून दिला २५० धावांचा टप्पा

Glenn Phillips Century: ग्लेन फिलिप्सने भारताविरुद्ध चौथ्या टी२० सामन्यात वादळी शतक केले. त्यामुळे न्यूझीलंडने भारताविरुद्ध अडीचशे धावांचा टप्पा पार करक विक्रमी लक्ष्य ठेवले आहे.
Glenn Phillips | India vs New Zealand T20I

Glenn Phillips | India vs New Zealand T20I

Sakal

Updated on: 

New Zealand vs India 4th T20I: शुक्रवारी (३० ऑक्टोबर) ऑकलंडला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चौथा टी२० सामना सुरु आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासून विकेट्स घेण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने वादळी शतकी (Glenn Phillips Century) खेळी केली आहे. त्याला मायकल ब्रेसवेलचीही (Michael Bracewell) दमदार साथ मिळाली.

त्यांच्या आक्रमक खेळींमुळे न्यूझीलंडने भारतासमोर २६० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. न्यूझीलंडने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये दुसऱ्यांदाच २५० धावांचा टप्पा पार केला आहे. तसेच भारताला प्रतिस्पर्धी संघाने टी२० मध्ये दिलेले हे सर्वात मोठे लक्ष्य ठरले आहे. यापूर्वी इतके मोठे लक्ष्य भारताला कधीही मिळाले नव्हते. त्यामुळे आता विजयासाठी भारताला इतिहास घडवावा लागेल.

Glenn Phillips | India vs New Zealand T20I
IND vs NZ, 4th T20I: श्रेयस अय्यरचा विश्वविक्रम, तर भुवीची जागा घेणाऱ्या मयंक यादवचे न्यूझीलंडला ५ ओव्हरमध्येच मोठे धक्के
Loading content, please wait...