

Arshdeep Singh | India vs New Zealand 1st ODI
Sakal
New Zealand vs India, 1st ODI: बुधवारपासून सुरू झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने गाजवला आहे. त्याने पहिल्याच सामन्यात ४ विकेट्स घेत मोठा विक्रम केला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना ऑकलंडला खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा फायदा भारतीय वेगवान गोलंदाजांनी उचलला.