

Arshdeep Singh Omits Jasprit Bumrah From Top 5 Indian Bowlers
Sakal
अर्शदीप सिंगने नुकतेच त्याच्यानुसार सर्वोत्तम ५ भारतीय गोलंदाज कोण आहेत, याबाबत खुलासा केला आहे. तसेच त्याने त्याची सर्वकालिन सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनही निवडली आहे. मात्र त्याने त्याच्या सर्वोत्तम ५ गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) मात्र स्थान न दिल्याने अनेकांना आश्चर्य वाटले आहे. बुमराह सध्याचा भारतीय संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज आहे.
अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) सर्वोत्तम गोलंदाज म्हटले आहे. त्याच्याबाबतीत त्या थोडा पक्षपाती असल्याचेही त्याने सांगितले आहे. भुवनेश्वरला त्याने मोहम्मद शमी, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, आर अश्विन यांच्याही आधी त्याने स्थान दिले आहे. ही निवड अर्शदीपने कृष्णंक आत्रेच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना केली आहे.