

Aryavir Sehwag Century | U19 Asia Cup | India vs UAE
Sakal
U19 Asia Cup 2026, IND vs UAE : १९ वर्षांखालील आशिया कप २०२६ स्पर्धेत मंगळवारी (१० नोव्हेंबर) भारत विरुद्ध संयुक्त अरब अमिराती (UAE) या युवा संघात सामना होत आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी करो वा मरो असा आहे.
कारण हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर होणार आहे. अशात या महत्त्वाच्या सामन्यात आर्यवीर सेहवागने (Aryavir Sehwag) आपली प्रतिभा दाखवून दिली असून खणखणीत शतक (Century) केले आहे.