IPL 2027 Trade: दिल्लीच्या २८ वर्षीय फिनिशरवर गुजरात-लखनौची नजर, त्याच्यासाठी मोजणार का वेगवान गोलंदाजाची किंमत?

Gujarat Titans Eye Trade Move for Delhi Capitals Powerhitter: आयपीएल २०२७ लिलावापूर्वी खेळाडूंच्या ट्रेडिंच्या चर्चांना वेग आला आहे. सध्या दिल्ली कॅपिटल्सच्या २८ वर्षीय अष्टपैलू खेळाडूवर गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्सची नजर असल्याचे समजत आहे.
Gujarat Titans

Gujarat Titans

Sakal

Updated on: 

IPL 2027 Trading Update: इंडियन प्रीमियर लीग २०२७ चा लिलाव पुढच्या महिन्यात गोव्यामध्ये होणार आहे. त्याआधी १७ नोव्हेंबरपर्यंत सर्व संघांना संघातून करारमुक्त केले जाणारे खेळाडू आणि संघात कायम केले जाणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर करायची आहे. पण त्याआधी खेळाडूंच्या ट्रेडिंगच्या चर्चांना उधाण आले आहे.

आयपीएल २०२६ स्पर्धा संपल्यापासून अनेक मोठे ट्रेड फ्रँचायझींमध्ये झाले आहेत. आगामी काळातही काही चकीत करणारे ट्रेड होण्याची शक्यता आहे. सध्या दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) २८ वर्षीय खेळाडूवर अनेकांचे लक्ष आहे, हा खेळाडू म्हणजे आशुतोष शर्मा (Ashutosh Sharma).

Gujarat Titans
IPL 2027 Trade : दुनिया हिला देंगे ते वनक्कम! अक्षर पटेल CSK, तर अर्शदीप सिंग Mumbai Indians च्या ताफ्यात! मजेशीर Video Viral
Loading content, please wait...