Bangladesh defeated Hong Kong in the Asia Cup 2025
esakal
बांगलादेशने आशिया चषक २०२५ च्या पहिल्या लढतीत हाँगकाँगवर विजय मिळवला.
हाँगकाँगने सुरुवातीला बांगलादेशच्या सलामीवीरांना धक्के दिले पण पुढे लढा देऊ शकला नाही.
कर्णधार लिटन दास व तौहिद हृदोय यांच्या निर्णायक भागीदारीने विजय पक्का केला.
Bangladesh vs Hongkong Asia cup 2025 live: बांगलादेशने आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्या लढतीत हाँगकाँगवर विजय मिळवला. आता ब गटात अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांचे प्रत्येकी दोन गुण झाले आहेत. हाँगकाँगकडून फलंदाजीत समाधानकारक खेळ पाहायला मिळाला. त्यांनी बांगलादेशच्या सलामीवीरांना सुरुवातीला धक्के दिल्यानंतर सामन्यात चुरस निर्माण होईल असे वाटले होते. पण, कर्णधार लिटन दास व तौहिद हृदोय यांनी निर्णायक भागीदारी करून संघाचा विजय पक्का केला.