Asia Cup 2025: वैभव सूर्यवंशीला बीसीसीआयने तातडीने बोलावले; टीम इंडियात एन्ट्री देण्यासाठी स्पेशल ट्रेनिंग, सीनियर्सना रिप्लेस करणार

Vaibhav Suryavanshi Asia Cup 2025 training news : आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाची तयारी जोरात सुरू आहे. अनुभवी खेळाडूंच्या निवृत्तीनंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी बीसीसीआयने तरुण प्रतिभावंत वैभव सूर्यवंशीला तातडीने बोलावले आहे. वैभव सध्या खास स्पेशल ट्रेनिंग घेत असून त्याच्यावर टीम इंडियाच्या भविष्यातील योजना अवलंबून आहेत.
Vaibhav Suryavanshi
Vaibhav Suryavanshi esakal
Updated on
Summary
  • BCCI ने 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीला सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये विशेष सरावासाठी बोलावले.

  • रोहित शर्मा व विराट कोहलीच्या निवृत्तीच्या चर्चेत भविष्यातील खेळाडू तयार करण्याचा प्रयत्न.

  • IPL 2025 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी 35 चेंडूत शतक झळकावून वैभव चर्चेत आला.

Vaibhav Suryavanshi in high-intensity training : रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या वन डे क्रिकेटमधून निवृत्तीच्या चर्चा सुरू असताना बीसीसीआने भविष्याची तयारी सुरू केली आहे. बीसीसीआयने भारतीय क्रिकेटचा भविष्याचा चेहरा शोधण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीला सेंटर ऑफ एक्सलेन्स ( COE) मध्ये विशेष सरावासाठी बोलावले आहे. ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध भारत अ यांच्यात २१ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेच्या दृष्टीने वैभवला ही संधी देणे महत्त्वाचे समजले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com