Asia Cup 2025 India captain Suryakumar Yadav viral press conference
esakal
आशिया चषक २०२५ चे अनावरण मोहसिन नक्वी यांच्या उपस्थितीत झाले आणि ८ संघांचे कर्णधार उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने आपल्या मजेशीर उत्तरांनी सर्वांचे लक्ष वेधले.
"भारत प्रबळ दावेदार आहे का?" या प्रश्नावर सूर्या म्हणाला – "किसने बोला? मैने तो नही सुना?" (हसला).
Suryakumar Yadav hilarious reply to journalist in press conference : आशिया चषक २०२५ स्पर्धेला आजपासून सुरुवात होतेय आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या उपस्थितीत आज ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. सहभागी ८ संघांचे कर्णधार यावेळी उपस्थित होते आणि त्यानंतर झालेली पत्रकार परिषद भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने गाजवली. भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेच्या जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. पण, यावरही सूर्यकुमारने मजेशीर उत्तर दिले. सूर्याच्या उत्तराने हश्या पिकला होता. त्यात त्याने संजू सॅमसनच्या ( Sanju Samson) खेळण्यावरही त्याने विधान केलं.