IND vs BAN Live : लाचार पाकिस्तान! इच्छा नसताना भारताच्या विजयासाठी प्रार्थना करावी लागणार; भावाशी करणार गद्दारी

Asia Cup 2025 final scenarios IND vs BAN live updates : आशिया कप २०२५ मध्ये सुपर ४ फेरी रंगात आली असून अंतिम फेरीसाठीची गणितं अधिक गुंतागुंतीची झाली आहेत. पाकिस्तानला या वेळी भारतावरच अवलंबून राहावं लागणार आहे.
Pakistan rely on India’s victory against Bangladesh to stay alive in Asia Cup 2025 final race.

Pakistan rely on India’s victory against Bangladesh to stay alive in Asia Cup 2025 final race.

esakal

Updated on
Summary
  • पाकिस्तानने श्रीलंकेवर विजय मिळवत फायनलच्या शर्यतीत स्वतःला टिकवले.

  • या विजयासह पाकिस्तानचा नेट रन रेट ०.२२६ झाला आणि ते दुसऱ्या स्थानी पोहोचले.

  • पाकिस्तानच्या फायनल आशा आता भारताच्या बांगलादेशविरुद्धच्या विजयावर अवलंबून आहेत.

Pakistan qualification hopes depend on India in Asia Cup Super 4 : पाकिस्तान संघाने आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ मधील लढतीत काल श्रीलंकेवर विजय मिळवला. या विजयासह त्यांनी फायनलच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे, परंतु त्यांच्या भविष्याची चावी भारताच्या हातात आहे. आशिया चषक स्पर्धेच्या या पर्वात एकमेव अपराजित राहणाऱ्या संघाचा मान भारताकडेच आहे. भारताने सुपर ४ मध्ये पाकिस्तानचा पराभव करून विजयी चौकार खेचला अन् आज त्यांच्यासमोर बांगलादेशचे आव्हान आहे. पण, पाकिस्तानला आता त्यांचा भाऊ म्हणजेच बांगलादेशसी आज गद्दारी करावी लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com