Asia Cup 2025: हार्दिक पांड्याला इतिहास घडवण्याची संधी; १७ धावा अन् जगात कुणालाच न जमलेला विक्रम होणार नावावर

Hardik Pandya milestone update: आशिया कप २०२५ मध्ये टीम इंडिया जोरदार तयारीसह मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. हार्दिकला फक्त १७ धावांची गरज आहे.
Hardik Pandya
Hardik Pandyaesakal
Updated on
Summary
  • हार्दिक पांड्या आशिया कप २०२५ मधून भारतीय संघात पुनरागमन करणार आहे.

  • भारताचा पहिला सामना १० सप्टेंबरला संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध खेळला जाणार आहे.

  • हार्दिकला आशिया कपमध्ये केवळ १७ धावांची गरज आहे ऐतिहासिक विश्वविक्रमासाठी.

Hardik Pandya Asia Cup 2025 history-making batting performance : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आशिया चषक २०२५ स्पर्धेतून पुनरागमन करणार आहे. आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकल्यांतर हार्दिक भारतीय संघाकडून मॅच खेळलेला नाही आणि तो दमदार पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. हार्दिकच्या अष्टपैलू कौशल्यामुळे टीम इंडियाला अनेक विजय मिळवता आले आहेत आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमधील त्याचे ते शेवटचे षटक इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले गेले आहे. आता आशिया चषक स्पर्धेत ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये आपला दम दाखवायला तो तयार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com