
Suryakumar Yadav, Salman Ali Agha | IND vs PAK | Asia Cup 2025
Sakal
भारताने आशिया चषक २०२५ सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवला आणि सुपर ४ मध्ये आपले स्थान पक्के केले.
भारतीय खेळाडूंनी सामन्यानंतर पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन टाळले, सूर्यकुमार यादवने विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित केला.
पाकिस्तानच्या माजी कर्णधार राशिद लतीफने भारतीय संघाच्या वागणुकीवर वादग्रस्त विधान केले.
Rashid Latif’s Explosive Remark Amid Asia Cup Tensions : भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेतील लढतीत पाकिस्तानी खेळाडूंनी न केलेले हस्तांदोलन शेजाऱ्यांच्या जरा खूपच जिव्हारी लागलं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर IND vs PAK यांच्यातला हा पहिलाच क्रिकेट सामना होता आणि त्यामुळे या सामन्याबाबत अनेक मतमतांतरं होती. पण, सरकारच्या निर्णयानुसार भारतीय संघ हा सामना खेळला, परंतु त्यांनी वेगळ्या पद्धतीने आपला निषेध नोंदवला. सामन्यानंतर पाकिस्तानचा संघ हस्तांदोलनासाठी मैदानावर वाट पाहत असताना भारतीय खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये निघून गेले.