Pakistan manager Naveed Akram Cheema officially protested against India
esakal
आशिया चषक २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानवर ७ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.
सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करता थेट ड्रेसिंग रूम गाठली.
पाकिस्तान संघाचे व्यवस्थापक नवीद अख्तर चीमा यांनी भारताविरुद्ध औपचारिक तक्रार नोंदवली.
Asia Cup 2025 controversy over India Pakistan dressing room drama : भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेतील कालच्या लढतीनंतर घेतलेला पवित्रा पाकिस्तानला आवडलेला नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध आणखी ताणले गेले आहेत आणि त्यानंतर प्रथमच दोन्ही संघांमध्ये क्रिकेटचा सामना खेळवला गेला. भारताने या सामन्यावर बहिष्कार टाकावा अशी अनेकांची भूमिका होती, परंतु भारतीय संघ खेळला अन् पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर त्यांची आणखी लाज काढली. भारतीय खेळाडूंनी शेजाऱ्यांसोबत हस्तांदोलनच केले आणि त्यामुळे पाकिस्तान खेळाडू सैरभैर झाले आहेत. पाकिस्तानी संघाचे व्यवस्थापक नवीन अक्रम चीम यांनी भारताविरुद्ध औपचारिक तक्रार दाखल केली आहेत.