Asia Cup 2025: भारताच्या 'या' दोन खेळाडूंमुळे India vs Pakistan सामन्याची तिकीटं विकली जात नाहीत; एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचा मोठा दावा

Emirates Cricket statement on India Pakistan ticket sales : आशिया चषक २०२५ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान या रोमांचक सामन्याची तिकीट विक्री यंदा अपेक्षेप्रमाणे झाली नाही. एमिरेट्स क्रिकेट बोर्डाने याबाबत मोठं विधान केलं आहे.
Why IND vs PAK Asia Cup 2025 tickets not sold out

Why IND vs PAK Asia Cup 2025 tickets not sold out

esakal

Updated on
Summary
  • आशिया कप 2025 मधील भारत–पाक सामना तिकीट विक्रीत अपयशी ठरत आहे.

  • दुबई स्टेडियमचे अर्ध्याहून अधिक तिकीट रिकामी असून अपेक्षित प्रतिसाद नाही.

  • पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय प्रेक्षकांत पाकिस्तानविरुद्ध नाराजी आहे.

Low Ticket Sales for India vs Pakistan Clash in Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान यांच्यातला सामना दोन दिवसांवर आला आहे आणि दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमची निम्मी तिकीटही विकली गेलेली नाही. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट काय कोणतेच संबंध ठेवता कामा नये, अशी भारतीयांची भावना आहे. पण, यावर केंद्र सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट करताना बहुदेशीय स्पर्धेत Ind vs Pak सामन्याला विरोध करणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे १४ सप्टेंबरला हा सामना होतोय, परंतु या सामन्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या इतिहासात प्रथमच रिकाम्या खुर्च्यांसमोर लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com