IND vs SL Live: श्रीलंकेची फडफड, भारताची वाढवलेली धडधड! Asia Cup 2025 मध्ये सुपर ओव्हरचा थरार

India vs Sri Lanka Marathi News: आशिया कप 2025 मधील भारत-श्रीलंका सामन्यात श्रीलंकेची सुरुवातीची फडफड पाहून भारतीय संघाची धडधड वाढली होती. श्रीलंकेच्या फलंदाजांनी आधीच २०२ धावांचे लक्ष्य सहज साध्य होईल असे भासवले, पण पथूम निसंका ने जोरदार शतक झळकावले.
Pathum Nissanka scores a brilliant century with a 127-run partnership with Kusal Perera

Pathum Nissanka scores a brilliant century with a 127-run partnership with Kusal Perera

esakal

Updated on

India vs Sri Lanka Asia Cup 2025 Marathi Live: श्रीलंकेने आशिया चषक स्पर्धेतील त्याच्या शेवटच्या लढतीत चांगली फडफड केली आणि त्यांचा खेळ पाहून टीम इंडियाची धडधड नक्की वाढवली. स्पर्धेबाहेर गेलेल्या श्रीलंकेसमोर २०२ धावांचे लक्ष्य भरपूर आहे, असा भ्रम भारतीय गोलंदाजांना झाला होता. पण, पथून निसंकाने शतक झळकावून तो भ्रमाचा भोपळा फोडला आणि त्याला कुसल परेराची साथ मिळाली. या दोघांनी मॅच भारताच्या ताब्यातून खेचून नेली होती, पंरतु परेराची विकेट पडली अन् भारतीय गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन केले. पण,शेवटच्या चेंडूवर रन आऊट न झाल्याने सामना बरोबरीत सुटला अन् सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com