Team India took the field without Rohit Sharma, Virat Kohli, or Ravindra Jadeja for the first time in 21 years
esakal
भारताने यूएईला केवळ ५७ धावांत गुंडाळून ९ विकेट्स राखून ऐतिहासिक विजय मिळवला.
यूएईविरुद्धची ५७ धावांची ही खेळी पुरुषांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील भारताविरुद्धची सर्वात निचांक धावसंख्या ठरली.
कुलदीप यादव (४-७) आणि शिवम दुबे (३-४) या विजयाचे नायक ठरले.
Team India Asia Cup 2025 new era players : भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात दुबळ्या युएईवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. यूएईचा संपूर्ण संघ ५७ धावांवर गुंडाळल्यानंतर भारताने ४.३ षटकांत विजय मिळवला. भारताने ९ विकेट्स व ९७ चेंडू राखून बाजी मारली. कुलदीप यादव व शिवम दुबे या विजयाचे नायक ठरले. पण, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात प्रथमच एक आश्चर्यकारक चित्र पाहायला मिळाले. ७७१० दिवसांत प्रथम भारतीय संघासोबत असे घडले आहे.