टीम इंडिया आता थेट आशिया कप 2025 मध्ये उतरणार असून इंग्लंड दौऱ्यानंतर महिनाभर विश्रांती मिळणार आहे.
सूर्यकुमार यादव फिटनेसच्या मार्गावर असून कर्णधार म्हणून त्याची उपस्थिती निश्चित मानली जात आहे.
संघात संजू सॅमसनला यष्टीरक्षक म्हणून प्राधान्य, तर लोकेश राहुलला T20 साठी डावलले जाऊ शकते.
Asia Cup 2025 Team India final list : इंग्लंड दौऱ्यानंतर आता टीम इंडिया जवळपास महिनाभर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नाहीए.. भारतीय संघ आता थेट आशिया चषक २०२५ स्पर्धेत खेळणार आहे आणि आता या संघात कोण कोण खेळाडू असतील याची चर्चा सुरू झाली आहे. ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्यावर शस्त्रक्रीया झाली आहे आणि तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसनासाठी दाखल झाला आहे. त्याला तंदुरुस्त होण्यासाठी पुरेसा वेळ आहे आणि त्याचे खेळणे निश्चित आहे. अक्षर पटेल उप कर्णधार असणार आहे.