Kuldeep Yadav on not getting enough chances in Team India
esakal
कुलदीप यादवने आशिया चषक २०२५ च्या पहिल्या सामन्यात ७ धावांत ४ विकेट्स घेतल्या.
भारताने यूएईवर ९ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला.
उत्कृष्ट कामगिरीसाठी कुलदीप यादवला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
Kuldeep Yadav on not getting enough chances in Team India : कुलदीप यादवने पुन्हा एकदा मिळालेल्या संधीचं सोनं करताना ७ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. भारताने आशिया चषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात यूएईवर ९ विकेट्स राखून विजय मिळवला. कुलदीपला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. कुलदीपने त्याच्या कामगिरीने टीकाकारांना गप्प केले. आता तरी त्याला सातत्याने संधी मिळेल, अशी अपेक्षा चाहते करत आहेत. याच मुद्यावर जेव्हा सामन्यानंतर संजय मांजरेकरने प्रश्न विचारला, तेव्हा तो व्यक्त होणार इतक्यात माईक बंद झाला...