
भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील संबंध गेल्या काही महिन्यात अधिक बिघडले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम अनेक क्षेत्रांवर पडला आहे. क्रीडा क्षेत्राचाही त्यात समावेश आहे.
पहलगाम दशहतवादी हल्ल्यानंतर भारतानेही त्या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर मिशन सिंदूरच्या अंतर्गत दिले. त्यानंतर दोन्ही संघात युद्धजनक परिस्थितीही उद्भवली होती. यामुळे भारतातून असे पडसाद उमटले की पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारचे क्रिकेट खेळले जाऊ नयेत.