Pakistani journalist sparks controversy by calling Suryakumar Yadav BJP spokesperson
esakal
आशिया कप २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानवर ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवत सुपर ४ मध्ये प्रवेश केला.
नाणेफेकनंतर सूर्यकुमारने पाक कर्णधार सलमान अली आगाला हात न मिळवता थेट निघून गेला.
सामन्यानंतरही भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन टाळत थेट ड्रेसिंग रुममध्ये परतले, ज्यामुळे पाकिस्तान संतप्त झाला.
Suryakumar Yadav called BJP spokesperson by Pakistani journalist : भारत-पाकिस्तान यांच्यातला आशिया चषक स्पर्धेचा सामना संपला... भारताने ७ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवून सुपर ४ मधील आपली जागा पक्की केली.. पण, या सामन्यात टीम इंडियाने काढलेली इभ्रत पाकिस्तानच्या जिव्हारी लागलीय... त्यामुळे माजी खेळाडूंसह पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष संतापले आणि त्यांनी आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे. आता पाकिस्तानी पत्रकारही सैरभैर झाले आहेत आणि काहीही बरळत आहेत.